-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) सध्या तिच्या आगामी ‘लग्नाचा शॉट’ (Lagnacha Shot Marathi Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
यानिमित्ताने प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काश्मीरमधील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नैसर्गिक सौंदर्याची खाण असलेल्या आणि ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये या चित्रपटाचे काही विशेष भाग चित्रित झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनी गुलाबी रंगाच्या सुंदर जॉर्जेट साडीत दिसत असून, बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्गरम्य वातावरणात तिचा हा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
प्रियदर्शिनीने या फोटोंना ‘काश्मीरचं सौंदर्य IS अमर्याद’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या चित्रपटात प्रियदर्शिनीबरोबर अभिनेता अभिजीत आमकर मुख्य भूमिकेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
