-
मराठी कलाविश्वातील लाडकी अभिनेत्री सुरुची अडारकर सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या खास स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.
-
सुरुची अडारकरने पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या ‘इक्कत’ साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलवले आहे.
-
गुलाबी रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाऊजसह तिने पारंपरिक साडीला एक आधुनिक टच दिला आहे.
-
साडीवर परिधान केलेला नाजूक खड्यांचा हार आणि झुमके तिच्या लूकमध्ये राजेशाही थाट आणत आहेत.
-
केसांत माळलेला पांढरा गजरा आणि कपाळावरील टिकलीने सुरुचीच्या सौंदर्याची शोभा वाढवत आहेत.
-
‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची या पारंपरिक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
-
सध्या ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सुरुचीने तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
साध्या, पण तरीही अतिशय मोहक अशा या लूकमध्ये सुरुची खऱ्या अर्थाने मराठमोळी सुंदरी दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
