-
अभिनेता प्रसाद ओक यांच्या मोठ्या मुलगा सार्थक ओकचा साखरपुडा नुकताच पार पडला असून हा कौटुंबिक सोहळा पार पडला.
-
या खास दिवशी प्रसाद ओक यांनी पारंपरिक पण एलिगंट असा लूक केला होता, ज्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फिकट हिरव्या रंगाचा सिल्क कुर्ता आणि त्यावर परिधान केलेली नाजूक नक्षीकाम असलेली शाल त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा रुबाब देत होती.
-
साधेपणा आणि रुबाब यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या या लूकमध्ये पाहायला मिळतो, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.
-
पारंपरिक मोत्याची अंगठी, साधे चष्मे आणि नीटस हेअरस्टाइलमुळे त्यांचा एकूणच लूक अधिक खुलून दिसत आहे.
-
या पोस्टला प्रसाद ओक यांनी मिर्झा गालिब यांचे शब्द कॅप्शन म्हणून दिले आहेत – “इस सादगी पे कौन न मर जाए ऐ ख़ुदा, लड़ते हैं और हाथ में तलवार भी नहीं.”
-
हे कॅप्शन त्यांच्या लूकप्रमाणेच साधेपणाचे आणि भावनात्मक असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
-
साखरपुड्याच्या आनंदातही प्रसाद ओक यांचा संयमित आणि सोज्वळ स्वभाव या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
