-
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सहावे सुवर्णपान म्हणजेच ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ (Ranapati Shivray Swari Agra) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला असून, त्याचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.
-
या मालिकेतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि ‘सुभेदार’ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
आता या प्रवासातील थरारक अध्याय म्हणजेच महाराजांची ‘आग्र्याहून सुटका’ या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
प्रीमियर सोहळ्याला उपस्थित असलेल्या दिग्गज कलाकारांनी आणि मान्यवरांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“इतिहासातील हा सर्वात थरारक अध्याय मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक वेगळा अनुभव असेल,” असा विश्वास दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिजीत श्वेतचंद्र/इन्स्टाग्राम)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
