-
झी मराठीवरील ऐतिहासिक आणि गाजलेली मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) महाराणी ‘सोयराबाई’ यांची भूमिका साकारून अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (Snehlata Vasaikar) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
-
सोयराबाईंच्या या खंबीर आणि प्रभावी भूमिकेने स्नेहलताला मराठी कलाविश्वात एक नवी ओळख मिळवून दिली असून आजही चाहते तिला याच नावाने ओळखतात.
-
अभिनयाबरोबरच आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्नेहलताने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड कॉटन ड्रेस परिधान केला होता.
-
स्नेहलताने या फोटोशूटला ‘खुदसे मोहब्बत हो जाए तो जिंदगी फिरसे नई लगने लगती है’ असे कॅप्शन दिले आहे.
-
आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून करणाऱ्या स्नेहलताने आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
पडद्यावरील भूमिकेव्यतिरिक्त व्यायामाची आवड आणि शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी स्नेहलता ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
Ajit Pawar Plane Crash Details: अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतर स्फोट होण्यापूर्वी काही मिनिटांत काय घडलं? प्रत्यक्षदर्शी माजी सरपंचांचा मोठा दावा, म्हणाले…
