-
मराठी चित्रपट व मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि यशस्वी निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) सध्या तिच्या एका खास लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आपल्या अभिनय कौशल्याने आणि निर्मिती क्षेत्रातील भरारीने श्वेताने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी श्वेता आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते.
-
नुकतेच श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही मोहक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्वेताने हिरव्या रंगाची जांभळा काठ असलेली सिल्क साडी नेसली आहे.
-
मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते श्वेताच्या नव्या डिझाईनच्या जांभळ्या ब्लाऊजने.
-
आपल्या या लूकला पूर्ण करण्यासाठी श्वेताने साजेसा मेकअप, गळ्यात हार, कानातले आणि हातात शाही तोडे असा पारंपारिक साज केला आहे.
-
अंबाडा हेअरस्टाईल आणि त्यावर माळलेली पांढरी जिप्सीची फुले तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
