-
क्रिकेटपटू स्मृती मानधना मागील काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
स्मृती मानधना संगीतकार पलाश मुच्छलला डेट करत होती.
-
पण ठरलेल्या तारखेच्या आदल्या दिवशी सांगलीत हे लग्न मोडलं.
-
त्यांच्या लग्नासाठी सांगलीला गेलेला अभिनेता नंदिश संधूने आता काही खुलासे केले आहेत.
-
लग्न मोडण्याचं कारण काहीही असो. पण खरं सांगायचं झाल्यास मी त्यांचं प्रेम पाहिलं आहे. – नंदिश संधू
-
“गेल्या पाच-सहा वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात किती वेडे होते, हे मी पाहिलं आहे. ते खूपच क्युट आणि छान कपल होते,” असं नंदिश संधू म्हणाला.
-
“लग्न पुढे ढकलण्यात आलं आणि त्याचं कारण जे बातम्यांमध्ये आलं होतं तेच होतं. सर्वांना तेच सांगण्यात आलं होतं. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. ते रुग्णालयात होते. आणि म्हणूनच लग्न पुढे ढकलण्यात आले,” असं नंदिश संधूने सांगितलं.
-
पलाशवर होणाऱ्या फसवणुकीच्या आरोपांबद्दल नंदिश म्हणाला, “पलाशला त्याची बाजू मांडू द्या. पलाशवर आरोप होत आहेत, पण कोणीच त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधलेला नाही,” असा दावाही नंदिश संधूने केला.
-
(सर्व फोटो- पलाश मुच्छल व स्मृती मानधना इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
