-
‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) सध्या तिच्या नव्या कोऱ्या ‘ठरलंय FOREVER’ (Tharlay Foreverr) या नाटकामुळे चर्चेत आहे.
-
या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच, ऋताच्या एका नव्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या नाटकात ऋताबरोबर अभिनेता कपिल रेडेकर आणि अक्षता आचार्य मुख्य भूमिकेत आहेत.
-
द्विभाषिक संवाद, लाईव्ह म्युझिक आणि तरुणाईची बदलती भाषा यांचा अनोखा संगम या नाटकात पाहायला मिळतो.
-
“मला पारंपरिक चौकटीतले नाटक करायचे नव्हते. हे नाटक धाडसी असून ते थेट आजच्या तरुण पिढीच्या भाषेत संवाद साधते,” असे मत दिग्दर्शक ऋषी मनोहर यांनी व्यक्त केले आहे.
-
ऋताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने राखाडी रंगाचा ब्लेझर सूट ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंना ऋताने ‘Chic Happens’ असे हटके कॅप्शनही दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
