-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली ‘कॉमेडी क्वीन’ अर्थात अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
निमित्त होते, नुकत्याच पार पडलेल्या (Pune International Film Festival 2026) २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF).
-
पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचा समारोप बालगंधर्व रंगमंदिरात दिमाखात पार पडला.
-
या सोहळ्यात महाराष्ट्र चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमी विकास प्राधिकरणाचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.
-
या खास सोहळ्यासाठी श्रेयाने तिची आई नूतन बुगडे यांची गुलाबी रंगाची चेक्स साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या साडीवर तिने मॅचिंग फूल स्लीव्ह ब्लाऊज आणि आकर्षक दागिन्यांचा साज केला होता.
-
यावेळी श्रेयाने लोकप्रिय मराठी अभिनेता क्षितिज दातेबरोबर (Kshitish Date) खास फोटोशूटही केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
