-
अमिताभ बच्चन यांचं इंडस्ट्रीत मोठं नाव असल्यानं त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनकडेही त्याच अपेक्षेनं, पाहिलं गेलं. अनेकदा या दोघांमध्ये तुलनाही केली जाते. पण, बॉक्स ऑफिसवर जरी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी ओटीटीवर मात्र अभिषेकच्या कलाकृतींना चांगलं यश मिळालं.
-
आज अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ओटीटीवर उपलब्ध असलेल्या त्याच्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. त्यामध्ये कालीधर लापता ते घुमर यांसारख्या एकूण आठ चित्रपटांचा समावेश आहे. ते चित्रपट कोणते आहेत जाणून घेऊयात…
-
I want to talk – शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या भूमिकेत पाहायला मिळतो, ज्याला कर्करोगाचं निदान झालेलं असतं. त्यामध्ये वडील व मुलगी यांच्यातील घट्ट बाँडही पाहायला मिळतो. हा चित्रपट अॅमेझॉनवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
-
कालीधर लापता – ‘कालीधर लापता’मध्ये अभिषेकने कालीधरची भूमिका साकारली आहे. त्याला कुटुंबाकडून वगळले जात असल्याची जाणीव झाल्याने तो घरातून बाहेर पडतो. त्यानंतर त्याला आठ वर्षांचा अनाथ मुलगा (बल्लू) भेटतो, ज्याच्याकडे जीवनाची उमेद, उत्साह व जिद्द आहे. त्या बल्लूशी त्याची मैत्री होते. हा चित्रपट तुम्ही झी ५वर पाहू शकता
-
घुमर – हा एक स्पोर्ट ड्रामा आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनने अपयशी ठरलेल्या एका क्रिकेटरची भूमिका साकारली आहे, जो एक दिव्यांग मुलीच्या गुरू बनतो. त्यातील भावनिक नातं मन जिंकतं. हा चित्रपट तुम्हाला झी ५वर पाहायला मिळेल.
-
लुडो – अनुराग बासू दिग्दर्शित हो एक डार्क कॉमेडी चित्रपटआहे. त्यामध्ये अभिषेक बच्चन एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतो. त्यामधील त्याच्या कामाचं अनेकांनी कौतुक केलेलं. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहण्यासठी उपलब्ध आहे.
-
दसवी – यामध्ये अभिषेक बच्चनने एका अशिक्षित राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे, जो तुरुंगात असताना दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो. त्यामधील अभिषेकच्या भूमिकेचं त्यातील कॉमिक टायमिंग आणि हरयाणवी भाषेवरील प्रभुत्व यांसाठी अनेकांनी कौतुक केलं. हा चित्रपटही तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
बॉब बिसवा – हा एक थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनने एका कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली आहे, ज्याची स्मरणशक्ती कमी असते. त्यामधूनही त्यानं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट झी ५ वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
-
गुरू – अभिषेक बच्चनबरोबर या चित्रपटात त्याची पत्नी ऐश्वर्या रायसुद्धा झळकलीय. गावातील एक साधा मुलगा ते उद्योजक, असा त्याचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
मनमरझिया – यामध्ये अभिषेक बच्चने एका बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो खूप शांत आणि समजूतदार असतो; परंतु तो मॉडर्न लव्ह स्टोरीमध्ये अडकतो आणि तिथून त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं. त्यामध्ये अभिषेक बच्चनचे दमदार संवाद पाहायला मिळतात. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
