-
शाहरुख खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला त्याचे चाहते रोमान्सचा किंग म्हणतात. पण जेव्हा तो अॅक्शन-थ्रिलर चित्रपटांत काम करतो. तेव्हा स्क्रीनवर वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतो.
-
डॉन – या चित्रपटात शाहरुख खान एकदम स्टायलीश आणि खतरनाक अंदाजात पाहायला मिळतो. डॉनची भूमिका आजही शाहरुखच्या आयकॉनिक भूमिकांपैकी एक मानली जाते. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
-
जवान – अॅटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील सर्वात पावरफुर अॅक्शन चित्रपट मानला जातो. यामध्ये तो दुहेरी भूमिकेत पाहायला मिळतो. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
पठाण – वायआरएफची निर्मिती असलेला हा एक स्पाय अॅक्शन चित्रपट आहे. या मध्ये शाहरुख एक्स रॉ एजेंटच्या भूमिकेत पाहायला मिळतो. यामध्ये दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे त्रीकुट पाहायला मिळतं. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहाण्यासठी उपलब्ध आहे.
-
करण अर्जुन – ९०च्या काळातील शाहरुख खानच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी हा एक आहे. यामध्ये सलमान खान व शाहरुख खान एकत्र पाहायला मिळतात. हा चित्रटही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहाण्यासठी उपलब्ध आहे.
-
रईस – हा चित्रपटात गुजरातमधील अशा व्यक्तीवर आधारित आहे जो गैरमार्गाने पैसे कमवत असतो. यातील शाहरुख खानची ग्रे शेड व्यक्तीरेखा आणि दमदार संवाद चित्रपटातील महत्त्वाचा भाग आहे. हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
-
फॅन – यामध्येही शाहरुख खान एका स्टारच्या आणि त्याच्या चाहत्याच्या अशा दोन्ही भूमिकेतून पाहायला मिळतो. यामध्ये कोणतीही नायिका नसून शाहरुखच या चित्रपटाचा नायक आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
-
येत्या काळात शाहरुख खान ‘किंग’ या अजुन एका अॅक्शन चित्रपटातून झळकणार आहे. याममध्ये त्याच्यासह दीपिका पादुकोण व त्याची मुलगी सुहाना खानही झळकणार आहे.(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
