-
अभिनेता विशाल निकम गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे, मात्र त्याने हे नातं गुलदस्त्यात ठेवलं होतं. अशातच काही दिवसांपूर्वी त्याने गर्लफ्रेंडचा फोटो शेअर केला.
-
विशाल त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख ‘सौंदर्या’ असा करतो, हे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वापासूनच सर्वांना माहीत आहे आणि ही सौंदर्या आहे अभिनेत्री अक्षया हिंदळकर.
-
‘जिच्याशिवाय माझ्या मनाचं वृंदावन रिकामं आहे ती…’ असं म्हणत विशालने खास पोस्ट शेअर केली होती. या फोटोंमधून विशाल-अक्षयाचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता.
-
अक्षय-विशाल हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. आजवर त्यांनी एकत्र फोटो कधी शेअर केले नव्हते. पण नातं जाहीर केल्यानंतर दोघे एकत्र फोटो शेअर करत आहेत.
-
अशातच विशाल-अक्षया यांनी शेअर केलेल्या देवदर्शनाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नाआधी दोघे देवदर्शनासाठी गेले असून याचे खास क्षण त्यांनी शेअर केले आहेत.
-
विशाल-अक्षया यांनी नुकतंच कोल्हापूरला जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेतलं. एकमेकांचे हात हातात घेत आणि कपाळाला गुलाल लावलेले फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
-
ज्योतिबाच्या दर्शनाचे खास फोटो शेअर करीत विशाल-अक्षया यांनी “चांगभलं देवा.. लक्ष असू दे.. साथ राहू दे…” असंही म्हटलं आहे. या फोटोंवर चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
-
विशाल-अक्षया यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, दोघांनी २०१९ मध्ये स्टार प्रवाहवरील ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेत दोघे एकमेकांचे प्रेयसी आणि प्रियकर दाखवले होते.
-
अक्षया-विशाल यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता दोघे लग्नबंधनात कधी अडकणार, याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/राहुल पवार फोटोवाला)
“तिचं विशेष कौतुक…”, स्मृती मानधनाने जॉर्जिया वॉल नव्हे ‘या’ खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय, फायनलनंतर काय म्हणाली?
