-
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी इंडस्ट्रीतला लोकप्रिय कलाकार आहे.
-
तो टीव्ही मालिका, आम्ही सारे खवय्ये सारखा शो तसेच नाटक यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
-
संकर्षणच्या कवितादेखील लोकप्रिय आहेत. त्याच्या कवितांचा चाहतावर्ग आहे. विविध सामाजिक-राजकीय विषयांवर आधारित, तसेच कविता मनात घर करणाऱ्या त्याच्या कविता कायमच चर्चेचा विषय ठरतात.
-
तो नाटक आणि कवितांच्या कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी दौरेदेखील करतो.
-
सध्या संकर्षण ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाच्या प्रयोगासाठी कतारला गेला आहे.
-
कतारमध्ये गेल्यानंतर त्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून त्याचा लूक लक्ष वेधून घेत आहेत.
-
तसेच, हे फोटो शेअर करताना ‘धुरंधर’मधील FA9LA हे गाणे लावले आहे.
-
संकर्षणने शेअर केलेल्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो सौजन्य: संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट