-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळेने पत्नी मोनिका महाजन पुसावळेसोबत घरी पारंपरिक पद्धतीने सत्यनारायणाची पूजा केली.
-
जांभळ्या रंगाच्या कुर्त्यातील सुमित आणि जांभळ्या-तांबूस साडीतली मोनिका यांचा सणासुदीचा लूक फोटोंमधून खुलून दिसतो.
-
केळीची पाने, फुलांची आरास आणि पूजेची सुंदर मांडणी घरातील भक्तिमय वातावरण अधोरेखित करते.
-
पूजेदरम्यान दोघेही देवासमोर हात जोडून बसलेले क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
-
सत्यनारायण पूजेनंतरचा आनंदी आणि प्रेमळ क्षण टिपणाऱ्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले.
-
“Devotion is the highest path” अशी भावनिक कॅप्शन या फोटोंना देण्यात आली आहे.
-
साधेपणा, परंपरा आणि संस्कृती जपणारा सुमित-मोनिकाचा हा अंदाज विशेष चर्चेत आहे.
-
अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातील संस्कार आणि श्रद्धाही सुमित पुसावळे जपत असल्याचे या फोटोंमधून स्पष्ट होते.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुमित पुसावळे/इन्स्टाग्राम)
“मी आणि कंगना रणौत पती-पत्नीसारखे एकत्र राहिलो, मी आमच्यासाठी घर बांधत होतो”
