-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम विशाल निकम (Vishal Nikam) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर विशालची होणारी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकरच्या (Akshaya Hindalkar) मेहंदी सोहळ्याची (Mehndi Ceremony) जोरदार चर्चा रंगली आहे.
-
अक्षयाने मेहंदी सोहळ्यासाठी लाल रंगाचा पारंपरिक इरकल साडीपासून साकारलेला इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता.
-
अक्षयाच्या या हटके लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना अक्षयाने “विशाल, सखीच्या मेहंदीत तुझं नाव शोधायला तयार राहा,” असे कॅप्शन दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच या जोडीने दख्खनचा राजा कोल्हापूरच्या ज्योतिबाचे दर्शन घेतले होते.
-
“चांगभलं देवा… लक्ष असू दे, साथ राहू दे,” अशा शब्दांत विशालने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
“मी हा पुरस्कार…”, वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार कोणाला समर्पित केला? जेतेपद पटकावल्यानंतर नेमकं काय म्हणाला?
