-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी २’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) सध्या तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ‘बिग बॉस’च्या घरात सर्वाधिक गाजलेली ही स्पर्धक आता तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत आहे.
-
नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये शिवानीने मोरपंखी रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
शिवानीचा हा बॉस लेडी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोंना शिवानीने ‘Power Looks Calm On Me’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवानीच्या या स्टायलिश अंदाजावर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
शिवानीने आजवर मराठी आणि हिंदी मालिकांसह चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
“मी हा पुरस्कार…”, वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार कोणाला समर्पित केला? जेतेपद पटकावल्यानंतर नेमकं काय म्हणाला?
