-
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लवकरच ‘माँ बहन’ (Maa Behen Web Series) या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नुकताच या सीरिजचा टीझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला.
-
या सोहळ्यासाठी माधुरीने केशरी रंगाची फ्लोरल प्रिंटेड डिझायनर साडी नेसली होती.
-
माधुरीचा साडीतील लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
या वेब सीरिजमध्ये माधुरीबरोबरच सध्याची ‘नॅशनल क्रश’ तृप्ती डिमरी आणि अष्टपैलू अभिनेते रवी किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
‘माँ बहन’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
टीझरमधील माधुरीची संवाद बोलण्याची शैली, तिचा लूक आणि मुलींबरोबरचे तिचे भावनिक संभाषण प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
“मी हा पुरस्कार…”, वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार कोणाला समर्पित केला? जेतेपद पटकावल्यानंतर नेमकं काय म्हणाला?
