-
‘बिग बॉस मराठी’ विजेता आणि लोकप्रिय अभिनेता विशाल निकम लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
-
विशालची होणारी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिचा मेहंदी सोहळा काल अतिशय उत्साहात पार पडला.
-
या खास प्रसंगासाठी अक्षयाने लाल रंगाच्या पारंपरिक इरकल साडीपासून तयार केलेला सुंदर इंडो-वेस्टर्न ड्रेस निवडला होता.
-
सध्या सोशल मीडियावर अक्षयाच्या मेहंदी आणि हळदी समारंभाचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांची त्यांना पसंती मिळत आहे.
-
आज अक्षयाने आपल्या हातावर चढवलेल्या दागिन्यांचे आणि हिरव्या चुड्याचे मोहक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.
-
हे फोटो शेअर करताना तिने “विशाल निकम, तुझ्या नावाचा चुडा” असे प्रेमळ कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
लवकरच पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी विशाल आणि अक्षयावर सध्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
“सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर…”, हसन मुश्रीफ यांचं महत्त्वाचं विधान
