-
मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासोबत आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता.
-
कामाख्या मंदिराच्या भव्य आणि ऐतिहासिक शिल्पकलेसमोर उभ्या असलेल्या अभिजीत-सुखदाचा हा फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
या दर्शनावेळी अभिजीत पांढऱ्या रंगाच्या साध्या पण आकर्षक कुर्त्यात दिसत असून सुखदा हिरव्या-लाल साडीमध्ये अत्यंत प्रसन्न दिसते.
-
दोघांच्या गळ्यात घातलेले पिवळे हार आणि कपाळावरील कुंकू त्यांच्या भक्तीभावाला ठळकपणे दर्शवत आहेत.
-
कामाख्या देवीच्या दर्शनानंतर काढलेला हा फोटो अभिजीत आणि सुखदाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
“when ‘ She’ summoned us, and then, blessed us with the garlands she wore” !फोटोसोबत दिलेल्या या कॅप्शनमधून त्यांची श्रद्धा दिसून येते.
-
अभिजीत-सुखदाचा साधेपणा आणि पारंपरिक लूक चाहत्यांना विशेष आवडत आहे.
-
कामाख्या मंदिरातील हा आध्यात्मिक अनुभव अभिजीत आणि सुखदासाठी खास आणि संस्मरणीय ठरल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होते.
-
(सर्व फोटो सौजन्य:सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
“सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर…”, हसन मुश्रीफ यांचं महत्त्वाचं विधान
