-
बॉलीवूडमधील ८०-९० च्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह. अमृता सिंहचा आज वाढदिवस आहे.
-
अमृतानं अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर कामं केली आहेत. तिनं लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्न केलेलं.
-
सैफ व अमृता यांच्या लग्नानंतर त्यांना सारा अली खान व इब्राहिम अली खान अशी दोन मुलं झाली. दोघेही आता अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का की, अमृता सैफशी लग्न करण्यापूर्वी प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूला डेट करत होती.
-
अमृता सिंह भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना डेट करत होती. दोघांची प्रेमकहाणी त्या काळी बरीच गाजलेली; परंतु हे नातं काही पुढे गेलं नाही.
-
रवी शास्त्री यांच्याबरोबरचं नातं तुटल्यानंतर अमृतानं पुढे सैफ अली खानशी लग्न केलं. परंतु, लग्नाच्या काही वर्षांनंतर अमृता व सैफ अली खान विभक्त झाले.
-
सैफ अली खानबरोबरच्या घटस्फोटानंतर सारा व इब्राहिम अमृताबरोबरच राहिले. अमृतानं तिच्या दोन्ही मुलांना मोठं केलं.
-
सारा व इब्राहिम आता त्यांच्या वडिलांबरोबरही अनेकदा पाहायला मिळतात. ते त्यांची सावत्र आई करीना कपूर खानबरोबरही अनेकदा कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात.
-
अमृता सिंहबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खाननं काही वर्षांनंतर पुढे करीना कपूरशी लग्न केलं; परंतु अमृतानं घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं नाही. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समिती निकाल जाहीर; कुणी मारली बाजी, कुणाचा झाला पराभव?
