-
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणीने नुकत्याच एका खास कार्यक्रमात हजेरी लावताच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
दिशाने परिधान केलेली ही साडी पारंपरिक असूनही आधुनिक शैलीचा सुंदर मिलाफ दर्शवणारी आहे. गडद लाल रंगाच्या साडीवर असलेली सूक्ष्म नक्षी तिच्या लूकला अधिक उठाव देत आहे.
-
या साडीसोबत दिशाने कॉर्सेट स्टाईलचा ब्लाऊज घातला होता. सोनेरी आणि लाल रंगाच्या भरजरी नक्षीकामामुळे ब्लाऊज तिच्या संपूर्ण लूकचा खास आकर्षणबिंदू ठरला.
-
ऑफ शोल्डर डिझाईनचा ब्लाऊज आणि फिटिंग यांमुळे दिशाचा ग्लॅमरस अवतार अधिक ठळकपणे समोर आला. पारंपरिक साडीला असा मॉडर्न टच देण्यात तिने यश मिळवले आहे.
-
साडीची घडी आणि पदराची ड्रेपिंग स्टाईल अतिशय एलिगंट होती. चालताना साडीचा घेर तिच्या लूकमध्ये ग्रेस आणि रॉयल फील निर्माण करत होता.
-
दागिन्यांच्या बाबतीत दिशाने फार जड दागिने न वापरता मिनिमल ज्वेलरीला प्राधान्य दिले. सोनेरी रंगाचा नेकपीस आणि मॅचिंग कानातले तिच्या लूकला पूरक ठरले.
-
केसांची लांब वेणी आणि मोकळे फ्रंट स्ट्रॅड्स यांमुळे दिशाचा लूक अधिक सॉफ्ट आणि क्लासिक वाटत होता.
-
एकूणच लाल साडी, स्टायलिश ब्लाऊज आणि निवडक दागिन्यांच्या संगमामुळे दिशा पाटणीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:दिशा पाटणी/इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
