-
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.
-
जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलत असते.
-
बरेचदा जान्हवी कपूर तिच्या दिवंगत आईच्या आठवणीही सांगत असते.
-
जान्हवी कपूरने खुलासा केला आहे की रात्री तिचे आई-वडील झोपल्यानंतर ती लपून त्यांच्या खोलीत जात असे.
-
जान्हवी कपूरला आई-वडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याबद्दल खूप काळजी वाटायची. त्यामुळे ती त्यांच्या खोलीत जायची आणि ते दोघेही ठीक आहे का? ते बघायची.
-
अभिनेत्रीने रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ते दोघे जिवंत आहेत ना, हे बघायला त्यांच्या खोलीत जायचे, असं जान्हवीने सांगितलं.
-
जान्हवी कपूर म्हणाली की, ती लहान होती तेव्हा तिला भीती वाटत होती की ती आई-वडील गमावेल. मोठी झाल्यावरही तिला हीच भीती असायची.
-
त्यामुळे दोघांचाही श्वास सुरू आहे ना, हे बघायला ती अनेकदा रात्री त्यांच्या खोलीत जात असे.
-
आई श्रीदेवींचं जाणं अद्याप स्वीकारू शकले नाही, असं जान्हवीने या मुलाखतीत सांगितलं. जान्हवी कपूर म्हणाली, एका विशिष्ट वयानंतर आई-वडील तुमची मुलं बनतात आणि तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते. (सर्व फोटो – जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
