-
झहीर खानची पत्नी व एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सागरिका नेहमीच तिच्या संतुलित फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते, ज्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
-
सागरिका घाटगेने नुकताच हिरव्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधील आपला एक रॉयल लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
या अनारकली ड्रेसवर हाताने अतिशय सुबकपणे फुलांची चित्रकला करण्यात आली आहे, ज्यामुळे या पेहरावाला एक वेगळीच आणि कलात्मक ओळख प्राप्त झाली आहे.
-
गडद हिरव्या रंगाच्या या पेहरावासोबत तिने मॅचिंग ओढणी आणि साधे दागिने परिधान केले असून, तिचा हा साधेपणा सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
मेकअपचा अतिवापर न करता, नैसर्गिक सौंदर्यावर भर देणारी सागरिका या लूकमुळे सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.
-
सागरिकाने हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.
-
प्रेमाची गोष्ट या मराठीत चित्रपटात तिने प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.
-
(सर्व फोटो सौजन्य: सागरिका घाटगे/इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
