-
Vishal Nikam Akshaya Hindalkar Haldi Ceremony: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विशाल निकम आणि अक्षया हिंदळकरचा आज (१० फेब्रुवारी) उत्तराखंडमध्ये हळदी सोहळा पार पडला.
-
विशालने इन्स्टाग्रामवर ‘आज प्रेमाला हळदीचा रंग लागला’ असे कॅप्शन देत हळदी सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हळदी सोहळ्यासाठी अक्षयाने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे तर, विशालने क्रिम रंगाचा कुर्ता सूट परिधान केला आहे.
-
हळदी सोहळ्याच्या या फोटोंमध्ये ही जोडी अत्यंत आनंदी आणि सुंदर दिसत आहे.
-
विशाल आणि अक्षयाने स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
विशालने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अक्षयाने देखील मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम/इन्स्टाग्राम)
“सलमान खान आणि मी एकत्र नग्न आंघोळ करायचो”
