-
‘शुभविवाह’ या लोकप्रिय मालिकेतील ‘पौर्णिमा’ म्हणजेच अभिनेत्री कुंजिका काळविंटच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
-
याबद्दल कुंजिकानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत पुत्ररत्न प्राप्त झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.
-
यानंतर आठवड्याभरापूर्वी अभिनेत्रीच्या लाडक्या लेकाचं बारसंसुद्धा पार पडलं आहे. याचा खास फोटोसुद्धा तिने शेअर केला होता.
-
कुंजिकानं तिच्या मुलाचं नाव ‘कान्हा’ असं ठेवलं आहे. ‘कान्हा’ हे नाव श्रीकृष्णाशी संबंधित असल्यानं नावासह दहीहंडीची सजावट केली होती.
-
बाळ झाल्याच्या बरोबर एका महिन्यानंतर कुंजिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मुलगा झाल्याची गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
-
पोस्टमध्ये तिनं बाळाचा हात घेतल्याचा फोटो शेअर करीत “आमच्या आयुष्यात एका सुंदर आणि गोड मुलाचं आगमन झालं आहे”, असं म्हटलं होतं.
-
दरम्यान, अभिनेत्री कुंजिकाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिने अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
‘स्वामिनी” या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. नंतर ‘ती परत आलीये’ या हॉरर मालिकेतसुद्धा तिनं काम केलं आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
-
आई होण्याआधी ती स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. गरोदरपणामुळे तिनं मालिकेतून एक्झिट घेतली.
हार्ट अटॅक येण्याच्या ४८ तास आधी शरीर देतं ‘हे’ संकेत! वेळीच ओळखाल, तर वाचू शकतो जीव…
