-
लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड २३ जानेवारी २०२६ रोजी लग्नबंधनात अडकला. अभिनेत्याच्या पत्नीचं नाव डॉ. मैथिली भोसेकर असं आहे.
-
सिद्धार्थ व मैथिली थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर हनिमूनसाठी मालदीवला गेले होते.
-
मालदीव येथील सुंदर फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोंमध्ये निळाशार समुद्र, मालदीवमधील वॉटर व्हिलाची झलक पाहायला मिळत आहे.
-
तसेच सिद्धार्थ-मैथिलीने त्यांच्या डिनर डेटची झलक सुद्धा चाहत्यांना दाखवली आहे.
-
सिद्धार्थ व मैथिलीने मालदीवमधील समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
मैथिलीबद्दल सांगायचं झालं तर, ती सौंदर्यवती म्हणून ओळखली जाते. परदेशात पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत तिने ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. याशिवाय तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
-
सिद्धार्थने गेल्यावर्षी गोव्यात मैथिलीला लग्नाची मागणी घातली होती. मैथिलीला सरप्राइज देण्यासाठी अभिनेत्याने सुंदर प्लॅनिंग केलं होतं. यावेळी त्याने बॉलीवूड गाण्यांवर डान्स करत मैथिलीला फिल्मी स्टाइल प्रपोज केलं होतं.
-
दरम्यान, सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’, ‘मुरांबा’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ खिरीड इन्स्टाग्राम )
NA Permission Maharashtra : ‘बांधकामासाठी जमिनीच्या ‘एन.ए.’ परवानगीची गरज नाही, बांधकाम आराखडा हीच परवानगी…!’ जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा…
