-
कश्मिरा कुलकर्णी मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘लग्नानंतर होइलच प्रेम’ या मालिकेत पाहायला मिळत आहे.
-
‘लग्नानंतर होइलच प्रेम’ या मालिकेत कश्मिरा खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
कश्मिरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. अशातच तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
-
कश्मिराने यावेळी तिचे पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. याला तिने छान कॅप्शनही दिली आहे.
-
कश्मिराने गुलाबी ड्रेसमधील फोटो शेअर करत त्याला गालावर डिंपल आणि स्वभाव साधा सिंपल अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
कश्मिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचं को-ऑर्ड सेट परिधान केलं आहे. तिचा हा को-ऑर्डसेट पैठणीच्या साडीपासून तयार केल्याचं दिसतं.
-
कश्मिराच्या टॉपवर पैठणीच्या कापडाचा वापर करून विशेष डिझाइन तयार केल्याचं दिसतं. पैठणीचा वापर करून बनवण्यात आलेल्या या गुलाबी को-ऑर्डसेटमध्ये कश्मिरा खूप सुंदर दिसत आहे.
-
या ड्रेसवर तिने साजेसे डिझायनर दागिनेही परिधान केले आहेत. गळ्यामध्ये सुंदर डिझायनर हार आणि कानातले परिधान केले आहेत. (सर्व : फोटो)
केतू मागाल तेवढा पैसा देणार, नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव ‘या’ चार राशींवर पडणार… भाग्याची साथ पदोपदी लाभणार
