-
उत्तराखंड येथील त्रियुगीनारायण मंदिरात लोकप्रिय मराठी अभिनेता विशाल निकमचा लग्नसोहळा पार पडला आहे. हिंदू श्रद्धेनुसार, हे पवित्र स्थळ असून याठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.
-
विशाल व अक्षयाने त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोघांनी हरिद्वारमध्ये गंगाघाटवर साखरपुडा केला आणि यानंतर अक्षया-विशालचं लग्न त्रियुगीनारायण मंदिरात पार पडलं.
-
लग्नात या दोघांनीही सुंदर लूक केला होता. ऑरेंज रंगाचा लेहेंगा, केसांची वेणी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत होती.
-
विशाल निकम व अक्षया हिंदळकर यांचं लग्न अत्यंत साध्या व पारंपरिक पद्धतीने पार पडलं.
-
विशाल-अक्षया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अभिनेता ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता आहे. त्याने शोमध्ये सहभागी झाल्यावर आपल्या आयुष्यात ‘सौंदर्या’ आहे अशी कबुली नॅशनल टेलिव्हिजनवर दिली होती.
-
विशाल-अक्षयाने २०१९ मध्ये स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
-
यामुळेच लग्नाचे फोटो शेअर करताना सुद्धा अभिनेत्याने ‘साता जन्माच्या गाठी’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
विशाल-अक्षयाचा विवाहसोहळा १० फेब्रुवारीला पार पडला. याच दिवशी विशालचा वाढदिवस सुद्धा असतो. त्यामुळे अभिनेत्यासाठी हा दिवस खूपच खास ठरला आहे.
-
विशाल-अक्षयाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. लोकप्रिय कलाकार असूनही परंपरा जपत साध्या पद्धतीने लग्न केल्यामुळे या जोडीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : विशाल निकम इन्स्टाग्राम तसेच फोटोग्राफर-Kuldip Bapat, Aniruddha Kulkarni )
केतू मागाल तेवढा पैसा देणार, नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव ‘या’ चार राशींवर पडणार… भाग्याची साथ पदोपदी लाभणार
