-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’मधील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या मालिकेत ती ‘सावली’ ही मुख्य भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारत असून प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
-
नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये प्राप्ती एका सुंदर लाल रंगाच्या साडीच्या शिवलेल्या ड्रेसमध्ये अतिशय देखणी दिसत आहे.
-
तिने परिधान केलेल्या या ड्रेसला सोनेरी रंगाची बॉर्डर असून त्यावर नाजूक मोरपंखी नक्षीकाम करण्यात आले आहे.
-
या पारंपरिक पेहरावावर प्राप्तीने घातलेली नथ तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.
-
तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात मोत्यांचा सुंदर चोकर सेट आणि कानात साजेसे झुमके घातले आहेत.
-
प्राप्तीने आपले केस मोकळे सोडले असून कपाळावर लावलेली छोटी टिकली तिच्या मराठमोळ्या रूपाला साजेसा टच देत आहे.
-
सोशल मीडियावर प्राप्तीच्या या मराठमोळ्या लूकवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
डायबिटीज होणार नाही, कॅन्सर जवळही येणार नाही; फक्त ‘हे’ आबंट फळ आठवड्यातून एकदा तरी खा