-
व्हॅलेंटाईन डेच्या त्याच क्लासिक गाण्यांना पुन्हा पुन्हा पाहून कंटाळा आला आहे का? जर तुम्ही रोमँटिक असाल आणि चांगल्या चित्रपटांच्या शोधात असाल तर या प्रेमकथांना तुमच्या वॉचलिस्टमध्ये स्थान मिळायला हवे. (photo – unsplash)
-
इन द मूड फॉर लव्ह (२०००): दोन शेजाऱ्यांमध्ये खोल भावनिक नाते निर्माण झाल्याची कथा या चित्रपटात पाहायला मिळेल. (Photo – Youtube)
-
लाईक क्रेझी (२०११): एकमेकांपासून दूर असलेल्या जोडप्यांमधील प्रेम आणि त्यांच्यातील अंतर नातेसंबंधांना कसा आकार देतो, यावरील भावनिक आणि वेदनादायी कथानक यात आहे. (Photo – Youtube)
-
मिडनाईट इन पॅरिस (२०११): जुन्या आठवणी, कला आणि अनपेक्षित प्रेमाबद्दल एक विलक्षण रोमँटिक असा हा चित्रपट. पॅरिसच्या स्वप्नाळू पार्श्वभूमीवर, नशिबावर आणि प्रेमाच्या जादूवर विश्वास ठेवणाऱ्या रोमँटिक लोकांसाठी हा परिपूर्ण चित्रपट आहे. (Photo – Youtube)
-
पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर (२०१९): १८ व्या शतकातील फ्रान्समधील कलाकार आणि तिच्या दृष्टीतून चित्तथरारक प्रणय. शांत, तगमग आणि अविस्मरणीय अशी केमिस्ट्री असलेला एक उत्तम चित्रपट. (Photo – Youtube)
-
द लंचबॉक्स (२०१३): मुंबईतील एका कार्यालयात जेवणाच्या डब्याची चुकून झालेल्या डिलिव्हरीमुळे दोन जणात अनपेक्षित बंध निर्माण होतात. इरफान खान, निमरत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या अभिनयाने नटलेली ही प्रेमकथा अनेकांच्या जवळची आहे. (Photo – Youtube)
-
ब्लू जे (२०१६): ब्लॅक अँड व्हाईट दृश्यातील एक अनोखी कलाकृती. अनेक वर्षांनंतर शाळेतील दोन मित्र पुन्हा भेटतात. त्यांच्यातील जिव्हाळ्याचा, संवादात्मक आणि खोलवर आठवणींना उजाळा देणारा हा चित्रपट. (Photo – Youtube)
Video: पुण्याला जाणाऱ्या स्लीपर बसच्या चालकाचे प्रवासात मद्यप्राशन, खामगाव बस स्थानकात राडा
