-
मृण्मयी देशपांडेने वाळवंटात निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त वेळ घालवतानाचे हे खास फोटो शेअर केले आहेत.
-
मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये मृण्मयीचे हास्य अधिकच खुलून दिसत असून, चाहत्यांनी या फोटोंवर पसंतीचा वर्षाव केला आहे.
-
मृण्मयीने परिधान केलेला हा पांढरा शुभ्र स्लीव्हलेस ड्रेस तिच्या साधेपणाला आणि सौंदर्याला एक वेगळीच झळाळी देत आहे.
-
केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नव्हे, तर मृण्मयी एक प्रगल्भ लेखिका, दिग्दर्शिका व संवेदनशील कवयित्री म्हणूनही ओळखली जाते.
-
तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘कुंकू’सारख्या मालिकांमधून घराघरांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, आजही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
-
मृण्मयीचा स्वभाव अत्यंत मनमोकळा असून, तिच्या प्रत्येक कामात ती एक प्रकारची सहजता आणि साधेपणा जपत असते.
-
या फोटोंमध्ये ती निसर्गाचा आनंद घेताना दिसत असून, तिचा हा आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन चाहत्यांना नेहमीच प्रेरणा देतो.
-
तिचे हे हास्य आणि वाळवंटातील मुक्त वावर तिच्यातील उत्साही आणि चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने सकाळी उठताच करतात ‘एक’ महत्त्वाची गोष्ट; अनेकजण दुर्लक्ष करतात, पण ही सवय ठरते गेमचेंजर!
