-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत ती साकारत असलेली जानकीची भूमिका विशेष गाजत आहे.
-
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रेश्माने पती पवनसोबत खास पोस्ट शेअर केली आहे. “परफेक्ट व्हॅलेंटाईनसाठी कोणत्याही लक्झरीची गरज नसते… फक्त प्रेम, आदर, निष्ठा, काळजी आणि प्रामाणिक प्रयत्नांचीच गरज असते”, असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
पोस्टमधील फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन दोघेही हेल्मेट घालून बाईक राईडचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
रेश्माच्या हातात पिवळ्या रंगाच्या सुंदर फुलांचा बुके दिसतो. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
एका फोटोमध्ये दोघे मंदिरात दर्शन घेताना दिसतात. या क्षणातून त्यांच्या नात्यातील आध्यात्मिक जुळवाजुळवही जाणवते.
-
रेश्माने कॅप्शनमध्ये प्रेमाबद्दल खास विचार मांडले आहेत. “प्रेम म्हणजे आपल्या आयुष्यात कायम साथ देणारी योग्य व्यक्ती शोधणे होय. माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी साथ दिल्याबद्दल, कुटुंबाशी माझं नातं अधिक घट्ट केल्याबद्दल आणि कर्म व खऱ्या प्रेमावर मनापासून विश्वास ठेवायला शिकवल्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. मी खरोखरच कृतज्ञ आहे,” असा संदेश तिने दिला आहे.
-
वाहतुकीच्या गर्दीतही दोघांनी साधेपणाने साजरा केलेला व्हॅलेंटाईन डे चाहत्यांना भावला आहे. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
रेश्माचे हे साधे, पण मनापासूनचे सेलिब्रेशन तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या पोस्टने सोशल मीडियावर सकारात्मक चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
‘या’ मुलांकाच्या लोकांवर महादेव असतात सदैव प्रसन्न; पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी सर्वकाही सहज मिळवतात
