-
अभिनेत्री सुरुची अडारकरने नुकतेच बीड येथील श्री क्षेत्र योगेश्वरी देवीचे भक्तिभावाने दर्शन घेतले, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुरुची अतिशय सुंदर अशा लाल आणि क्रीम रंगाच्या साडीत दिसत असून, तिने आपला अस्सल मराठमोळा लूक जपला आहे.
-
नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र व हातात हिरव्या बांगड्या अशा पारंपरिक दागिन्यांनी तिच्या सौंदर्याची शोभा वाढवली आहे.
-
फोटो शेअर करताना तिने ‘अंबाबाईचा उदो उदो’ अशी कॅप्शन दिली असून, देवीप्रति असलेली तिची ओढ यातून स्पष्टपणे दिसून येते.
-
कपाळावर लावलेला कुंकवाचा मोठा टिळा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य यांमुळे सुरुची या फोटोंमध्ये अतिशय तेजस्वी दिसत आहे.
-
साध्या, पण मोहक साडीत सुरुचीने केलेल्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
‘मराठमोळं सौंदर्य’ काय असत, हे सुरुचीने या साडीतील फोटोंमधून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
-
“जय योगेश्वरी माते”, “खूप सुंदर दिसतेस” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
लाखात एक असतात ‘या’ राशीचे कपल्स, साक्षात शिव-पार्वतीप्रमाणे एकत्र राहून आयुष्यभर करतात सुखी संसार
