-
‘दृश्यम’फेम अभिनेत्री श्रिया सरन सध्या मालदीवमध्ये सुट्यांचा आनंद घेत असून तिचे समुद्रकिनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
विजय साळगावकरच्या पत्नीची म्हणजेच ‘नंदिनी’ची भूमिका साकारणाऱ्या श्रियाने बिकिनीमध्ये बोल्ड फोटोशूट करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
पांढऱ्या आणि चंदेरी रंगाच्या प्रिंटेड बिकिनीसह स्टायलिश गॉगल लावून, श्रियाने मालदीवच्या निळ्याशार पाण्यात आपला जलवा दाखवला आहे.
-
पती आणि मुलीसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करण्यासाठी श्रिया मालदीवला गेली असून, तेथील समुद्रकिनाऱ्यावरील तिचे मोकळेपणाने वावरणे चाहत्यांना भावत आहे.
-
वयाच्या ४३ व्या वर्षीही श्रियाने आपला फिटनेस अतिशय उत्तमरीत्या जपला असून, तिच्या या फोटोंमधील टोन्ड बॉडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-
नैसर्गिक हास्य आणि समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर काढलेले हे फोटो श्रियाच्या सौंदर्य अधिक खुलवत आहेत.
-
‘दृश्यम’ चित्रपटातील साध्या साडीतील नंदिनी आणि प्रत्यक्ष आयुष्यातील ही हॉट श्रिया पाहून, तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
-
साध्या साडीतील घरगुती ‘नंदिनी’ असो किंवा मालदीवमधील तिचा बिकिनी लूक, तिने प्रत्येक रूपात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया सरन /इन्स्टाग्राम)
तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
