-
धूर्त जगापासून दूर असलेल्या आणि प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या तीन भावांची गोष्ट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतली आहे.
-
२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाने रतन, चंदन आणि मदन या कुरळे बंधूंच्या किमयेने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले होते.
-
आता तब्बल दोन दशकांनंतर, या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ (Punha Ekda Sade Made Teen) १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
यावेळी लेखक-दिग्दर्शक अंकुश चौधरीने (Ankush Chaudhari) कथाकथनाच्या तंत्रात आधुनिक बदल केले आहेत.
-
जुन्या तीन भावांच्या जोडीला ‘बबन’ची साथ तर आहेच, पण सोबतीला एका नवीन पात्राची रंजक कथाही गुंफण्यात आली आहे.
-
या चित्रपटात दिग्गज अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्यासह रिंकू राजगुरू, सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, समृद्धी केळकर आणि संकेत पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार जोडी अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
-
निवेदिता सराफ यांनी काळ्या रंगाच्या डिझायनर साडीत आपले सौंदर्य खुलवले होते, तर अशोक सराफ यांनी कॅज्युअल टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये साधेपणा जपत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : अशोक सराफ/इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?