-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे साडीमधील काही नवे आणि अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी तिने गडद लाल रंगाची पैठणी परिधान केली असून, त्यावर पांढऱ्या रंगाचा नक्षीकाम केलेला पदर तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
सोनालीने या फोटोंमध्ये गळ्यात पारंपरिक जडावाचा हार आणि कानात मॅचिंग झुमके घातले आहेत, ज्यामुळे तिला राजेशाही लूक मिळाला आहे.
-
तिच्या हातावरील बारीक मेहंदी आणि मनगटात भरलेल्या हिरव्या बांगड्या तिच्या मराठमोळ्या रूपाला पूर्णत्व देत आहेत.
-
केसांची केलेली ‘हाफ क्लच’ हेअरस्टाईल आणि त्यावर लावलेली सोनेरी रंगाची हेअर ॲक्सेसरी चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
सोनालीने हे फोटो पोस्ट करताना ‘करवली duties करताना मी…’ अशी मजेशीर आणि गोड कॅप्शन दिली आहे.
-
एका फोटोमध्ये सोनालीचे खळाळून हसणे टिपले गेले असून, तिचे हे नैसर्गिक सौंदर्य चाहत्यांना खूप भावले आहे.
-
कौटुंबिक सोहळ्यासाठी केलेला हा सिंपल, पण एलिगंट लूक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
३० वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींची शनीच्या साडेसातीतून सुटका; गोल्डन टाईम सुरू होत येणार बक्कळ पैसा; श्रीमंतीचं दार खुलं होत मिळणार सुखच सुख
