-
विशाल निकम व अक्षया हिंदळकर १० फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नबंधनात अडकले.
-
विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नात अभिनेत्री रूपल नंदने आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या शाही सोहळ्यासाठी रूपलने अतिशय सुरेख असा क्रीम रंगाचा भरजरी सिल्क ड्रेस परिधान केला होता.
-
रूपलच्या या ड्रेसवरील नाजूक नक्षीकाम आणि ‘पफ स्लीव्हज’मुळे तिच्या लूकला एक वेगळीच शोभा आली होती.
-
या पारंपरिक लूकला पूर्णत्व देण्यासाठी तिने गळ्यात सोन्याचा मोती असलेला सुंदर ‘जोडवी’ स्टाईल चोकर घातला होता.
-
हातात भरलेल्या हिरव्या बांगड्या तिच्या या पारंपरिक पेहरावावर अधिकच खुलून दिसत होत्या.
-
सध्या रूपल ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत मुख्य पात्र असलेल्या अर्णवच्या बहिणीची महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
आपल्या आवडत्या कलाकाराच्या लग्नात रूपलचा हा ‘क्लासी’ आणि सात्त्विक अवतार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रूपल नंद/इन्स्टाग्राम)
३ वाजून २६ मिनिटांनी सूर्यग्रहण; १२ राशींवर कसा होईल परिणाम? काय करावे आणि काय टाळावे?
