-
लोकप्रिय मराठी अभिनेता मंदार जाधव सध्या आपल्या कुटुंबासोबत मध्य प्रदेशातील इंदूर शहरात सुट्यांचा आनंद घेत आहे.
-
मंदारने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून इंदूरच्या प्रसिद्ध ‘राजवाडा’ पॅलेससमोरचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
‘डे टूर टू इंदूर’ अशी कॅप्शन देत मंदारने या प्रवासातील खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले.
-
या फोटोंमध्ये मंदारसोबत त्याची पत्नी आणि मुलेदेखील अतिशय आनंदात दिसत असून, चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या ऐतिहासिक राजवाड्याचे सौंदर्य मंदारच्या या फोटोंमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे.
-
कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून मंदारने आपल्या लाडक्या कुटुंबाला या सहलीसाठी वेळ दिला आहे.
-
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये मंदार एका स्टायलिश कॅप आणि लाल रंगाच्या जॅकेटमध्ये अतिशय देखणा दिसत आहे.
-
मंदारने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य:मंदार जाधव/इन्स्टाग्राम)
Supriy Sule : “आत्या मी…”, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं होतं?
