-
महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलचे (Gautami Patil) ‘गच्ची’ (Gachi Song) हे नवीन गाणे ‘सारेगामा मराठी’च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
-
तरुणाईचा उत्साह आणि रोमँटिक लहेजा असलेल्या या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
प्रेमातील खोडकर भावना आणि धमाल मूड व्यक्त करणाऱ्या या गाण्यातील गौतमीच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या गाण्याच्या निमित्ताने गौतमीने इन्स्टाग्रामवर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमीने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साध्या पण तितक्याच प्रभावी अशा या कॉटन साडी लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
आपल्या नृत्यामुळे आणि संघर्षमय प्रवासामुळे नेहमीच चर्चेत राहणारी गौतमी या गाण्यामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
Supriy Sule : “आत्या मी…”, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं होतं?
