-
हल्ली ओटीटीची सर्वत्र प्रचंड क्रेझ आहे. पूर्वी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा किंवा टीव्ही हे पर्याय असायचे. परंतु, आता मात्र ओटीटीवर वेगवेगळे कथानक असलेले चित्रपट पाहायला मिळतात.
-
चित्रपट, वेब सीरिजसाठी ओटीटी हे माध्यम ओळखलं जातं. यामाध्यमातून असे अनेक कलाकार नावारुपाला आले आहेत. ज्यांना मोठ्या पडद्यावर हवी तशी ओळख मिळाली नव्हती.
-
पूर्वी बऱ्याचदा मोठे कलाकार ओटीटीवर काम करताना विचार करायचे. त्यांना यात संकोच वाटायचा. म्हणून ओटीटीवर अशा कलाकारांना संधी मिळाली जे मोठ्या पडद्यावर साहाय्यक भूमिका साकारायचे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांची नाव सांगणार आहोत जे ओटीटीमुळे प्रसिद्धीझोतात आले.
-
पंकज त्रिपाठी – या यादीत सर्वात आधी पंकज त्रिपाठी यांचं नाव घेतलं जातं. पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटांत छोट्या भूमिका साकारल्या. त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘फुकरे’ यांसारख्या चित्रपटात कामं केली परंतु, त्यांना यातून फार प्रसिद्धी मिळाली नाही.
-
जेव्हा त्यांनी ‘मिर्झापूर’मध्ये काम केलं तेव्हा त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. यामधून ते रातोरात स्टार बनले. यातील त्यांचे संवाद, अंदाज सगळंच व्हायरल झालं होतं.
-
जयदीप अहलावत – जयदीप यांनी ‘रइस’सारख्या अनेक चित्रपटांत काम केलं. परंतु, मोठ्या कलाकारांच्या गर्दीत ते मागे राहिले. २०२०मध्ये आलेल्या ‘पाताल लोक’ सीरिजमध्ये ते पोलिसाच्या भूमिकेत झळकलेले. यामध्ये त्यांनी हाथीराम चौधरी हे पात्र साकारलेलं. ज्यामधून त्यांना एक नवीन ओळख मिळाली.
-
मनोज बाजपेयी – मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनावर छाप सोडली आहे. ‘सत्या’मधून त्यांनी स्वत;ची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, ओटीटीवरील ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.
-
प्रतीक गांधी – थिएटर आणि गुजराती सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतीक गांधीलाही ओटीटीमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरणारन नाही.
-
टस्कॅम १९९२टमधून तो प्रसिद्धीझोतात आला आणि यामुळे फक्त गुजराती प्रेक्षकांपुरता मर्यादीत न राहता त्याला देशभरात ओळख मिळाली. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Photos: विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नात रूपल नंदचा शाही थाट; पारंपरिक लूकने वेधले लक्ष
