-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत (Onkar Raut) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
-
निमित्त आहे ते म्हणजे, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलबरोबरचं (Gautami Patil) त्याचं खास फोटोशूट!
-
ओंकार आणि गौतमीचं ‘गच्ची’ (Gachi Song) हे नवं गाणं ‘सारेगामा मराठी’च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
-
या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे काही खास फोटो ओंकारने शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना त्याने गौतमीचं कौतुक करत लिहिलं, “तुझ्याबरोबर काम करून खरच खूप मज्जा आली!!”
-
विशेष म्हणजे, या गाण्याच्या प्रमोशनवेळी गौतमीने घेतलेला उखाणा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
-
गौतमी म्हणाली, “ना वायफाय… ना इंटरनेट… गच्चीवर झाली आमची पहिली भेट.. ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट…”
-
(सर्व फोटो सौजन्य : ओंकार राऊत/इन्स्टाग्राम)
MPSC Result: राज्यसेवेच्या निकालाबाबत थेट एमपीएससीच्या सचिवांनी दिली माहिती, मुख्य परीक्षेच्या तारखेबाबतही…
