-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) आणि भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi) यांनी नुकतेच कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले.
-
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी (Shree Karveer Niwasini Ambabai Mahalaxmi Temple) या दोन्ही अभिनेत्रींनी कोल्हापुरात हजेरी लावली होती.
-
गिरीजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या दर्शनाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
“अंबाबाईचा उदो उदो” असे भक्तीमय कॅप्शन देत गिरीजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
यावेळी दोघींनीही फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
हातात देवीच्या ओटीचे ताट घेऊन मंदिर परिसरात दिलेल्या त्यांच्या पोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
भक्ती रत्नपारखीची ‘तुझ्या सोबतीने’ ही नवीन मालिका १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
ट्रम्प यांनी केली अमेरिका-जपान व्यापार कराराची घोषणा; भारतावर १८ टक्के टॅरिफ जपानवर मात्र…
