-
मानसी साळवी व स्नेहा वाघ या मराठमोळ्या अभिनेत्री हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहेत.
-
मानसी व स्नेहा यांनी आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
सध्या त्या ‘कर्लस टीव्ही’वरील मालिकेत नायिकेच्या आणि खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
-
‘महादेव अँड सन्स’ या मालिकेत या दोघी झळकत आहेत. मानसी यामध्ये भानू ही नकारात्मक भूमिका साकारत आहे तर स्नेहा विद्या ही सकारात्मक भूमिका साकारत आहे.
-
मालिकेत दोघी सख्या बहिणी दाखवल्या असल्या तरी त्यांच्यामध्ये मोठा वाद आणि मतभेद असल्या कारणाने त्या एकमेकींपासून दुरावलेल्या असतात. परंतु, दोघींचं ऑफस्क्रीन एकमेकींशी खूप चांगला जमत असल्याचं दोघी शेअर असलेल्या फोटो व व्हिडीओमधून पाहायला मिळतं.
-
आतासुद्धा स्नेहा वाघने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिचे व मानसीचे एकमेकींबरोबरचे फोटो पाहायला मिळत आहेत. जे त्यांनी फिल्मसिटीत काढले आहेत. याला तिने आम्ही फक्त दिसत नाही तर ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जगतोसुद्धा.
-
मानसीसुद्धा अनेकदा स्नेहाबरोबरचे फोटो शेअर करत असते. त्यांच्या व्यतिरिक्त या मालिकेत इतरही काही लोकप्रिय कलाकार पाहायला मिळतात.
-
मानसी व स्नेहा यांच्या हिंदी टेलिव्हिजनवरील कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्या हिंदी टेलीव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ठरल्या आहेत.
-
हिंदीसह दोघींही मराठीतही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. स्नेहा वाघ तर ‘बिग बॉस’ मराठीतही झळकलेली. तर मानसीने मराठी चित्रपटातही नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतचं गौतमी पाटीलबरोबर फोटोशूट; म्हणाला, ‘तुझ्याबरोबर…’
