-
‘माझा होशील ना’फेम लाडकी अभिनेत्री गौतमी देशपांडेने (Gautami Deshpande) वाळवंटात आपले नवीन ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये गौतमीने काळ्या रंगाचा स्टायलिश ऑफ-शोल्डर (off shoulder) आऊटफिट परिधान केला असून, ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात टिपलेले हे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
आपल्या या ‘डेझर्ट लूक’ला पूर्ण करण्यासाठी तिने चेहऱ्यावर काळ्या रंगाचे जाळीदार कापड (netted-mask) धरले आहे.
-
वाळवंटातील वाऱ्यामुळे विस्कटलेले तिचे केस आणि तिची मनमोहक पोझ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
गौतमीने हे फोटो शेअर करताना ‘In the middle of endless sand….. वाळवंट …..शांत …..स्तब्ध ….निःशब्द …’, अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी “Mashallah mashallah….” आणि “खुबसुरत” अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
आपल्या अभिनयासोबतच गौतमी आता आपल्या फॅशन सेन्सनेदेखील सर्वांना भुरळ घालत असल्याचे या फोटोंवरून सिद्ध होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौतमी देशपांडे/इन्स्टाग्राम)
शिवजयंतीच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा! स्टेटसला पोस्ट करा एकापेक्षा एक सुंदर मेसेज…
