-
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) शिवजयंती २०२६ निमित्त एक विशेष फोटोशूट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
-
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.
-
या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते.
-
स्वराज्य, धर्मनिष्ठा आणि सुशासन यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
-
या खास फोटोशूटसाठी अश्विनीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
शेतात हातात काठी घेऊन दिलेली तिची मर्दानी पोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
अश्विनी म्हणते, “आपल्या लेकी-बाळी तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा त्यांच्या मनगटात ताकद असेल. नुसती शिवजयंती साजरी करून चालणार नाही, तर ती साजरी करण्यालायक बनायला हवं!”
-
अश्विनीने पुढे असेही नमूद केले की, तिला मर्दानी खेळ शिकण्यासाठी “आता होऊ दे धिंगाणा” या टीमने प्रोत्साहित केले, त्याबद्दल तिने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
शिवजयंतीच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा! स्टेटसला पोस्ट करा एकापेक्षा एक सुंदर मेसेज…
