-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने पती शंभुराज खुटवड यांच्यासह आई तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले.
-
दर्शनावेळी प्राजक्ताने लाल रंगाची सुंदर जरीकाठाची साडी परिधान केली होती, ज्यात तिचा लूक अत्यंत सोज्वळ दिसत होता.
-
अभिनेत्रीच्या कपाळावरील मोठा शेंदरी टिळा आणि नाकातील पारंपरिक नथ तिच्या या मराठमोळ्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होती.
-
प्राजक्ताने हातात देवीची ओटी, नारळ व फळांचे ताट घेऊन देवीच्या गाभाऱ्यात श्रद्धेने पूजा-अर्चा केली.
-
दर्शनासाठी गेलेल्या प्राजक्तासोबत तिचे पती शंभुराज खुटवड हेदेखील पांढऱ्याशुभ्र शर्टमध्ये साध्या, पण प्रभावी लूकमध्ये पाहायला मिळाले.
-
गळ्यात सोन्याचे दागिने आणि भरजरी साडी अशा पूर्ण पारंपरिक अवतारात प्राजक्ताचे रूप खुलून दिसत होते.
-
अभिनयासोबतच आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या प्राजक्ताच्या या भक्तिमय फोटोंची सध्या इंटरनेटवर चर्चा होत आहे.
-
झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘महाराणी येसूबाईंची’ भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताचा हा पारंपारिक लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?