-
‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
रेश्माने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
-
लाल रंगाच्या कॉर्सेट सूट लूकमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसतेय. हे फोटोशूट अभिनेत्रीने तिच्या राहत्या घरी केलं आहे. त्यामुळे रेश्माच्या घराची झलक या फोटोंमध्ये चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
-
रेश्माच्या घरातील हॉल खूपच प्रशस्त आहे. अभिनेत्रीच्या घरातील आकर्षक फर्निचरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अभिनेत्रीच्या घरात पाळीव श्वान सुद्धा आहे. सोफा सेटच्या अगदी बाजूला रेश्माने शोभेची काही झाडं ठेवली आहेत.
-
बाल्कनीत एन्ट्री घेण्यापूर्वी रेश्माच्या घरातील एक खास कॉर्नर सर्वांचं लक्ष वेधून घेतो. यामध्ये शोभेच्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
-
रेश्माच्या घराची बाल्कनी खूपच मोठी अन् प्रशस्त आहे. इथून सुंदर व्ह्यू दिसतो…तिच्या बाल्कनीत छोटासा झोपाळा सुद्धा आहे.
-
अभिनेत्रीच्या घरातील खुर्च्या संपूर्ण इंटिरिअरला एक रॉयल अन् स्टायलिश लूक देतात. रेश्माने यावर सुंदर फोटो काढला आहे.
-
रेश्माने या फोटोंना “प्रियकरा माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट – तू आहेस” असं कॅप्शन देत यामध्ये नवरोबा पवनला टॅग केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम )
डायबिटीज होणार नाही, कॅन्सर जवळही येणार नाही; फक्त ‘हे’ आबंट फळ आठवड्यातून एकदा तरी खा