-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने काळ्या रंगाचा अतिशय देखणा आणि भरजरी डिझाइन असलेला ‘बनारसी सिल्क’ को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
तिने नेसलेल्या या स्कर्टला असलेला ‘हाय-थाय स्लिट’ कट तिच्या या पारंपरिक लूकला एक बोल्ड आणि आधुनिक टच देत आहे.
-
प्रियदर्शिनीने या आउटफिटवर ऑफ-शोल्डर पॅटर्नचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
अभिनेत्रीने तिच्या नैसर्गिक कुरळ्या केसांची (Curly hair) स्टाईल अगदी साध्या, पण प्रभावी पद्धतीने ठेवून तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
दागिन्यांच्या बाबतीत तिने कानात जड कुंदन झुमके आणि हातात मोठी अंगठी घालून एक रॉयल लूक तयार केला आहे.
-
फोटोंच्या बॅकग्राऊंडला असलेल्या गडद केशरी पडद्यांमुळे तिच्या काळ्या आणि सोनेरी रंगाच्या ड्रेसचे सौंदर्य अधिकच उठून दिसत आहे.
-
कॉमेडीच्या मंचावरून थेट फॅशन आयकॉन बनलेल्या प्रियदर्शिनीचा हा मराठमोळा स्वॅग सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
अजितदादांच्या शोकसभेत नाना पाटेकर बोलायला उभे राहिले, पण हात जोडत म्हणाले; “आज….”
