-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
-
नुकतेच सायलीने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचे (Shri Yogeshwari Devi Ambajogai) दर्शन घेतले.
-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांनंतर अत्यंत महत्त्वाचे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात सायलीने मनोभावे पूजा-अर्चा केली.
-
अंबाजोगाईचे हे मंदिर भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असून, नवरात्र आणि मार्गशीर्ष महोत्सवासाठी ते प्रसिद्ध आहे.
-
या भेटीचे काही खास फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी सायलीने नेसलेल्या हिरव्या पैठणी साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
सायलीच्या या साध्या पण मोहक सौंदर्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…