-
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीने नुकताच आपला दुसरा लग्नाचा वाढदिवस (2nd Wedding Anniversary) उत्साहात साजरा केला.
-
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त या जोडीने खास लूक केला होता.
-
प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश शर्ट आणि पॅण्ट घातली होती, तर क्षितिजा काळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.
-
या सेलिब्रेशनसाठी त्यांनी एक आकर्षक केकही कापला, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
प्रथमेश आणि क्षितिजाचा विवाह हा प्रेमविवाह आहे. त्यांची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती.
-
इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या गप्पांमधून आधी मैत्री झाली आणि ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान जेव्हा ते पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले, तेव्हा या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
-
‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’ आणि ‘टकाटक’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून प्रथमेशने घराघरांत ओळख निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…